latur – Iblis News

लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन
लातूर : भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे ‘खेलो इंडिया’ योजनेच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत रविवार, ७ जून २०२६ रोजी लातूर शहरात ‘संडे ऑन सायकल’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये तंदुरुस्ती व नियमित व्यायामाचे महत्त्व रुजवण्यासाठी तसेच लठ्ठपणाशी लढण्यासाठी आयोजित केलेल्या या सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होऊन राजीव गांधी चौक, वाडा हॉटेल, पी.व्ही.आर. चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल असा निश्चित करण्यात आला आहे.

तरी या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, नागरिक, सायकलिंग क्लब, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि खेळाडूंनी ७ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या उपक्रमासाठी https://fitindia.gov.in/world-bicycle-day या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

आरसीसी क्लासेस तात्काळ बंद करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
लातूर: नीट पेपर फुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसवर कठोर कारवाई करण्यात यावी, परवाना रद्द करावा, विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना समस्त लातूरकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

तसेच, पुढील दोन दिवसांत नीट क्लासेस सोडून, नवीन अकरावी बारावी ऍडमिशन न घेणे सदरील प्रकरणाचे कायदेशीर कारवाईच निकाल लागेपर्यंत क्लासेस तात्काळ बंद करणे, मान्य न झाल्यास आरसीसी क्लासेस समोर लातूरमधील विविध विद्यार्थी संघटना, युवा संघटना, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत भव्य निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.

यावेळी कुलदीप सूर्यवंशी, किरण चव्हाण, ॲड. राहुल मातोळकर, राणा चव्हाण, रोहित चवळे, अक्षय चवळे, राजाभाऊ चौगुले, नंदकिशोर साळुंखे, प्रशांत सुरवसे, धनराज शिंदे, बजरंग बप्पा चव्हाण, निलेश मांदळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर दौऱ्यावर
लातूर, दि. ३० : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ३० एप्रिल आणि १ मे २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री भोसले यांचे ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल व लातूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता त्यांचे हस्ते नूतनीकृत सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल व मुक्काम.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी सकाळी ८ वाजता बाभळगाव येथील पोलीस मुख्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमास पालकमंत्री भोसले उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता लातूर येथून विमानाने नवी मुंबईकडे प्रयाण करतील.

लातूर येथील काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्यातील एकजूट अभेद्य
लातूर : शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या दरम्यान झालेली आघाडी अभेद्य असून या पुढेही ती अभेद्य राहील असा विश्वास लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी व्यक्त केला आहे.

लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून ही आघाडी स्थापन झालेली आहे.लातूर महानगरपालिका निवडणुकीत या आघाडीला भरघोस असे यशही मिळाले आहे. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगला संदेश गेला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या या एकूण प्रक्रियेत आणि नंतरही काँग्रेस पक्षाने नेहमीच वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीचा सन्मान आणि आदर राखला आहे. त्यामुळे आगामी काळातही वंचित बहुजन आघाडीच्या, तसेच काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयमी भूमिका घ्यावी काँग्रेस – वंचित बहुजन आघाडीच्या मजबुतीला धक्का बसेल अशी विधाने करू.नयेत असे आवाहनही ॲड किरण जाधव यांनी या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे काम करून लातूर शहराच्या विकास प्रक्रियेला गती देतील, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची लातूर मधील सकारात्मक विचारातून निर्माण झालेली आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही ॲड किरण जाधव यांनी व्यक्त केला आहे.

…तर लातूरच्या महापौरपदासाठी भाजपचा वंचितला पाठींबा – आमदार संभाजी पाटील निलंगेकर
लातूर : काँग्रेसने निवडणूकीपूर्वी आघाडी करून विजयासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले. निवडणूकीत अपेक्षित लाभ पदरात पडल्यानंतर मात्र वंचितला बाजूला सारल्याचे दिसून आले. यामुळेच महापौर पदासाठी वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आघाडीने आपली उमेदवारी कायम ठेवली तर भाजपा वंचित बहुजन आघाडीच्या महापौर व उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारांना पाठींबा देईल, अशी माहिती भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

लातूर मनपाच्या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले होते. एका बाजूने काँग्रेस आघाडी आणि दुसºया बाजुने भाजपा अशी लढत झाली. वंचितच्या साथीमुळे पराभवाच्या छायेत असणारी काँग्रेस निवडणुकीनंतर बहुमतात आल्याचे दिसून आले. भाजपाने निवडणुकीत जोरदार लढत दिली. निवडणुकीनंतर जनतेने दिलेला कौल भाजपाने मान्य केला.

निवडणुकीनंतर निर्माण झालेले चित्र पाहता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा वापर केवळ सत्ता प्राप्त करण्यासाठी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर व उपमहापौर निवडताना वंचित बहुजन आघाडीलाही समान वाटा मिळणे अपेक्षित होते. परंतु तो मिळाला नसल्याचे चित्र समोर आले आहे. यातून आघाडीला मतदान केलेल्या मतदारांचाही अवमान झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेवून वंचित बहुजन आघाडीने महापौर पदासाठी निकिता रोहीत सोमवंशी तर उपमहापौर पदासाठी सचिन अर्जुनराव गायकवाड यांची उमेदवारी दाखल केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने सदर निवडणुक लभविण्याची भूमिका कायम ठेवत आपले उमेदवार माघारी घेतले नाहीत तर भाजपा वंचित बहुजन आघाडीला मतदानाच्या वेळी पाठींबा देईल, अशी माहिती भाजपा निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी…मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ. निलंगेकर यांची मागणी
लातूर : जिल्ह्यात आॉगस्ट- सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीने शेतीपिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी बाधित शेतकºयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे. सदर मदत मिळण्यास सुरुवात झाली असली तरी सर्वच शेतकºयांना दिवाळीपूर्वी या मदतीची रक्कम मिळावी आणि रब्बीच्या पेरणीसाठी जी मदत होणार आहे. ती मदत पेरणीच्या पंधरादिवस अगोदर व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने शेतकºयांच्या हातातून खरीप हंगाम गेलेला असून काही शेतकºयांच्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याच बरोबर नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. या पंचनाम्याच्या अहवालावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली आहे.

लातूर जिल्हा परिषद आरक्षणाची अधिसूचना जाहीर; कुठल्या सर्कलसाठी कुणाचं आरक्षण? वाचा
लातूर : जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आरक्षण सोडतीमध्ये निलंगा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती (महिला), औसा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती, उदगीर आणि चाकूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लातूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळकोट आणि रेणापूर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण (महिला), देवणी, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणूक विभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले-

१) अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
खंडाळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
हाडोळती – सर्वसाधारण
शिरुर ताजबंद– अनुसूचित जाती
अंधोरी- सर्वसाधारण
किनगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सावरगाव रोकडा – अनुसूचित जमाती

२) जळकोट तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
वांजरवाडा- सर्वसाधारण
माळहिप्परगा- सर्वसाधारण (महिला)
गुत्ती– अनुसूचित जाती (महिला)

३) उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
वाढवणा बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग
सोमनाथपूर- अनुसूचित जाती (महिला)
नळगीर – अनुसूचित जाती (महिला)
निडेबन – अनुसूचित जाती
लोहारा – अनुसूचित जाती
हेर- अनुसूचित जाती
तोगरी- सर्वसाधारण

४) देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
बोरोळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वलांडी – सर्वसाधारण (महिला)
जवळगा- सर्वसाधारण

५) शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
येरोळ – अनुसूचित जाती (महिला)
साकोळ – अनुसूचित जाती

६) चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
जानवळ– नागरिकांचा मागास प्रवर्ग
चापोली- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
रोहिणा – अनुसूचित जाती (महिला)
वडवळ (ना.)- नागरिकांचा मागास प्रवर्ग
नळेगाव- सर्वसाधारण

७) रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
पानगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
खरोळा – सर्वसाधारण (महिला)
कामखेडा – सर्वसाधारण (महिला)
पोहरेगाव – सर्वसाधारण (महिला)

८) लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग –
आर्वी- सर्वसाधारण (महिला)
भातांगळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग
महाराणा प्रतापनगर- अनुसूचित जाती
पाखरसांगवी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
हरंगुळ बु. – सर्वसाधारण (महिला)
काटगाव – सर्वसाधारण (महिला),
तांदुळजा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
मुरुड बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
निवळी- अनुसूचित जाती (महिला)
एकुर्गा- सर्वसाधारण

९) औसा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग –
लोदगा – सर्वसाधारण (महिला)
आलमला – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
खरोसा – सर्वसाधारण
लामजना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
भादा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
उजनी – सर्वसाधारण
आशिव – सर्वसाधारण (महिला)
मातोळा – सर्वसाधारण (महिला)
किल्लारी – सर्वसाधारण

१०) निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग –
निटूर – सर्वसाधारण
अंबुलगा बु. – सर्वसाधारण
लांबोटा – सर्वसाधारण (महिला)
दापका – सर्वसाधारण
हलगरा – सर्वसाधारण
औराद (शहा.) – सर्वसाधारण (महिला)
मदनसुरी – सर्वसाधारण (महिला)
सरवडी – सर्वसाधारण (महिला)
कासार शिरसी – सर्वसाधारण,
तांबाळा – अनुसूचित जमाती (महिला)