लातूर: नीट पेपर फुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसवर कठोर कारवाई करण्यात यावी, परवाना रद्द करावा, विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना समस्त लातूरकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तसेच, पुढील दोन दिवसांत नीट क्लासेस सोडून, नवीन अकरावी बारावी ऍडमिशन न घेणे सदरील प्रकरणाचे कायदेशीर कारवाईच निकाल लागेपर्यंत क्लासेस तात्काळ बंद करणे, मान्य न झाल्यास आरसीसी क्लासेस समोर लातूरमधील विविध विद्यार्थी संघटना, युवा संघटना, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत भव्य निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी कुलदीप सूर्यवंशी, किरण चव्हाण, ॲड. राहुल मातोळकर, राणा चव्हाण, रोहित चवळे, अक्षय चवळे, राजाभाऊ चौगुले, नंदकिशोर साळुंखे, प्रशांत सुरवसे, धनराज शिंदे, बजरंग बप्पा चव्हाण, निलेश मांदळे आदी उपस्थित होते.
