मनसेतून हकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश!

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून निलंबित झाल्यानंतर चर्चेत आलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संतोष नलावडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

भाजपमध्ये झालेला खेडेकरांचा प्रवेश केवळ वैयक्तिक पुनरागमन नसून कोकणात भाजपची संघटनात्मक घडी मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ही चाल खेळल्याने कोकणातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. 

वैभव खेडेकर हे मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. ते राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहिले असले तरी अलीकडच्या काळात त्यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू होताच मनसेने त्यांच्यावर कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली होती. 

तीन वेळा पुढे ढकलला गेलेला पक्षप्रवेश

खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. प्रत्येकवेळी काही ना काही कारणामुळे प्रवेश रखडत होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आज झालेल्या पक्षप्रवेशाने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

खेडेकर काय म्हणाले?

भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकर म्हणाले,

“पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगणं शक्य नाही. माझ्या देवाने मला स्वत:पासून दूर केलं, त्याचं दुःख आहे. मात्र आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असेल. मनसेतील अनेकांशी भावनिक नाती होती, पण भाजपने मला आपलंसं केलं.”

Vaibhav Khedekar Raj Thackeray

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments