उमरी (जि. नागपूर) : ड्रायकेम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उमरी यांच्या चॅरिटेबल संस्था वालप्लास्ट वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने CSR उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालई (ता. सावनेर) येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना टेबल, प्लास्टिक खुर्च्या, साऊंड सिस्टिम तसेच इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमावेळी कंपनीचे Mr. Ashish Shrivastava (HR), Mr. Nandkishor Mohatkar (Plant Manager) आणि Mr. Shubham Dhage (Admin) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापिका मंदाताई टोंगे यांनी फाउंडेशनचे आभार मानत अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला मोठा हातभार लागतो, असे सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळणार आहे.
