रामदास कदम यांच्यावर अनिल परब यांचा हल्लाबोल: “बायकोने स्वतःला जाळलं की जाळण्यात आलं? नार्को टेस्ट घ्या!”

मुंबई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“1993 मध्ये त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली की ती हत्या होती, याचा शोध लागायला हवा. रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनीच आपल्या वडिलांच्या उद्योगांची चौकशी करावी,” असं आव्हान अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

यावेळी परब यांनी रामदास कदम यांच्यावर डान्सबार, वाळूचोरी, जमीन हडप, दादागिरी, अप्रामाणिक उद्योग आदी अनेक आरोपही केले. “मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील अधिवेशनात कदम यांना वाचवलं, त्यामागे काय मजबुरी आहे?” असा सवालही त्यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर परब यांनी जोरदार आक्षेप घेतला. “दोन दिवस मृतदेह कसा ठेवता येईल? फिंगरप्रिंट घेणं, इंजेक्शन देणं ही काल्पनिक गोष्ट आहे. रामदास कदम यांच्या अक्कलच शाबूत राहिलेली नाही,” असा टोला परब यांनी लगावला.

Balasaheb Thackeray Ramdas Kadam Yogesh Kadam Anil Parab Maharashtra Politics

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments