‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ ; वसुबारसच्या दिवशी कशी पूजा करावी? तिथी, पूजा कालावधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Vasubaras 2025 : हिंदू धर्मातील वसुबारस या सणास मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण गोवत्स द्वादशी या नावानंही साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील वद्य द्वादशी तिथीला वसुबारस साजरी केली जाते. यंदा वसुबारस कधी आहे? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? पूजा कशी करावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया… 

काय आहे वसुबारसचं महत्त्व?

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्व भविष्य पुराणात सांगितलं आहे. हा सण नंदिनी व्रत या नावानेही साजरा केला जातो. कारण शैव परंपरेत नंदिनी आणि नंदी (बैल) दोन्ही अतिशय पवित्र मानले जातात. हा सण मुळात गाईंबद्दल मानवी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळं यादिवशी गाय आणि वासरू यांची एकत्र पूजा केली जाते. पूजेदरम्यान गव्हापासून तयार केलेले पदार्थ त्यांना खायला दिले जातात. असं मानलं जातं की, गोवत्स द्वादशीची पहिली पूजा राजा उत्तानपाद (स्वयंभू मनूचा मुलगा) आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी उपवास करून साजरी केली होती. त्यांच्या प्रार्थना आणि उपवासामुळं त्यांना ध्रुव नावाचा मुलगा झाला. या दिवशी स्त्रिया गहू आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करत नाहीत.

वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त

शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी बुधादित्य राजयोग आणि शुक्ल, ब्रह्मा, सिद्धी नावाचे शुभ योग जुळून येत आहेत. द्वादशी 17 ऑक्टोबर, सकाळी 11:12 वाजता सुरू होते आणि 18 ऑक्टोबर, दुपारी 12:18 वाजता संपते. त्यामुळं गाईची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:49 ते रात्री 8:20 पर्यंत राहील.

वसुबारस पूजा विधी

कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात. ही पूजा मुख्यतः संध्याकाळच्या वेळी केली जाते. पूजेपूर्वी त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घालला जातो. त्यांच्या कपाळावर सिंदूर किंवा हळदीचा तिळा लावला जातो. काही ठिकाणी गाय, वासरू यांची मूर्ती ठेवली जाते. त्यांना गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग नैवेद्य म्हणून दिला जातो. यानंतर आरती केली जाते. भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकेचे मुख्य साधन असल्यानं या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपास करतात.

DIWALI 2025 VASUBARAS

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments