गडचिरोली : वर्षानुवर्षं बंदुकींच्या आवाजाने दणाणलेल्या गडचिरोलीत आज शांततेचा जयघोष घुमला. नक्षलवादी नेता भूपती याच्यासह तब्बल 60 नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करत नवा अध्याय लिहिला आहे. ही घटना म्हणजे विश्वास, विकास आणि शांततेचा विजय असून नक्षलवादाविरोधातील राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाचा प्रकाश नेला. पोलिस दलाचं आधुनिकीकरण, गुप्तचर यंत्रणा मजबूत करणे आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या प्रवाहात आणणे या उपक्रमांमुळे या भागात बदलाची नवी पहाट उगवली आहे.
रस्ते, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली आता विकासाच्या वाटेवर झेपावणारा जिल्हा बनत आहे. या सकारात्मक बदलामुळे अनेक नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून शांततेचा स्वीकार केला आहे.
या ऐतिहासिक घटनेबद्दल गडचिरोली पोलिस दलाच्या कार्याचं विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या संयम, शौर्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आजचा दिवस गडचिरोलीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. आज गडचिरोलीने दाखवून दिलंविकासाचं शस्त्र बंदुकीपेक्षा सामर्थ्यवान असतं.
Bhupati and 60 Naxalites Surrender | Peace and Development under Devendra Fadnavis
