Union Budget 2026 : काय स्वस्त झालं? काय महाग झालं? जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. या बजेटमध्ये काही वस्तूंवर दिलासा देण्यात आला असून, काही गोष्टी मात्र महाग झाल्या आहेत.

सरकारकडून गरिबी निर्मूलन, आरोग्य, स्वदेशी उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनं आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं?

आरोग्य आणि सामान्य वापराच्या वस्तूंना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधं स्वस्त झाल्याने रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. यासोबतच कपडे, भारतात बनवलेले कपडे, चामड्याची बूटं आणि क्रीडा साहित्य स्वस्त झालं आहे. मोबाईल फोन, एलसीडी-एलईडी, वैद्यकीय उपकरणे स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना थेट फायदा मिळणार आहे.
हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ईव्ही वाहने, मोटारसायकल, ईव्ही बॅटरी, लिथियम आयन बॅटरी, सौर पॅनेल आणि सीएनजी स्वस्त करण्यात आले आहेत. याशिवाय फ्रोझन मासे आणि अपघात विमा देखील स्वस्त झाला आहे.

2026-27 च्या अर्थसंकल्पात काय महाग झालं?

दुसरीकडे, काही वस्तूंवर सरकारने कर वाढवल्यामुळे त्या महाग झाल्या आहेत.
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, खनिज पदार्थ, दारू आणि पीव्हीसी फ्लेक्स शीट्स यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

सामान्य नागरिकांवर काय परिणाम?

या बजेटमुळे आरोग्य, इलेक्ट्रिक वाहने आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार असून, पर्यावरणपूरक धोरणांना चालना मिळेल. मात्र दारू आणि काही औद्योगिक वस्तू महाग झाल्याने त्याचा परिणाम संबंधित क्षेत्रांवर दिसून येईल.

https://www.instagram.com/p/DUNeUbwDGNP/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments