पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; विधानसभेत १८ तास १० मिनिटांचे रेकॉर्डब्रेक कामकाज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार, 7 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथील विधानभवनात होणार असल्याची अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 14 बैठका घेण्यात आल्या असून 127 तास 54 मिनिटांचे प्रत्यक्ष कामकाज झाले.रोजच्या कामकाजाची सरासरी 9 तास 9 मिनिटे इतकी राहिली, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली

अधिवेशनादरम्यान 9095 प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी 410 प्रश्न स्वीकृत करण्यात आले आणि 58 प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. याशिवाय 500 प्रश्नांची लेखी उत्तरे देण्यात आली. अल्पकालीन चर्चेसाठी प्राप्त झालेल्या 6 सूचनांपैकी 5 मान्य करण्यात आल्या आणि 3 चर्चा पार पडल्या. लक्षवेधी सूचनांच्या 2998 सूचनांपैकी 292 स्वीकृत करण्यात आल्या, तर 62 सूचनांवर सभागृहात चर्चा झाली. नियम 293 अन्वये प्राप्त झालेल्या पाचही प्रस्तावांवर चर्चा झाली.

अधिवेशनादरम्यान सात अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. शासकीय 22 विधेयके पुरःस्थापित करण्यात आली. त्यापैकी 21 विधेयके विधानसभेने संमत केली, तर एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले. विधान परिषदेने नऊ विधेयके संमत केली. अशासकीय 29 विधेयकांच्या सूचनांपैकी 11 मान्य करण्यात आल्या. त्यापैकी 12 विधेयके पुरःस्थापित आणि आठ विचारात घेण्यात आली.

सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवरील 324 सूचनांपैकी 136 मान्य करण्यात आल्या आणि 10 चर्चा पार पडल्या. अर्धा तास चर्चेच्या 14 सूचनांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावरही सविस्तर चर्चा झाली.अधिवेशनात सदस्यांची सरासरी उपस्थिती 75.26 टक्के राहिली. सर्वाधिक उपस्थिती 84.96 टक्के नोंदविण्यात आली.

या अधिवेशनातील विशेष बाब म्हणजे 9 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता सुरू झालेली सभागृहाची बैठक 10 जुलै रोजी पहाटे 3.39 वाजेपर्यंत चालली. एका दिवसात तब्बल 18 तास 10 मिनिटे कामकाज झाले असून अनेक वर्षांनंतर इतक्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत सभागृहाचे कामकाज चालले आणि विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted