विदर्भासह मराठवाड्यातचार ते पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा इशारा

नागपूर: विदर्भात आजपासून पुढील चार ते पाच दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी अधिक प्रमाणात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस ढगाळी वातावरण राहील आणि तीव्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ही होईल असा अंदाज ही हवामान विभागाचा आहे. सोबत 40 ते 50 किमी गतीने वारे ही वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम ही विदर्भात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बाहेर पडताना काळजी घ्या

– राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अंदाजानुसार दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून, २६ तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवेल.
– विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांत दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस वाढू शकतो. यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर २८ तारखेला राज्याच्या पश्चिमेकडील भागांत पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज आहे.
– सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

english, heavy rain

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments