लातूर : जिल्ह्यात आॉगस्ट- सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीने शेतीपिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी बाधित शेतकºयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे. सदर मदत मिळण्यास सुरुवात झाली असली तरी सर्वच शेतकºयांना दिवाळीपूर्वी या मदतीची रक्कम मिळावी आणि रब्बीच्या पेरणीसाठी जी मदत होणार आहे. ती मदत पेरणीच्या पंधरादिवस अगोदर व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने शेतकºयांच्या हातातून खरीप हंगाम गेलेला असून काही शेतकºयांच्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याच बरोबर नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. या पंचनाम्याच्या अहवालावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली आहे.
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी…मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ. निलंगेकर यांची मागणी
Subscribe
Login
0 Comments
Oldest
