अर्चना पाटील चाकूरकर यांची साई फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा

लातुर :-पंढरपूर आषाढी वारीच्या मंगलमय पर्वानिमित्त परवा पासून लाखो वारकरी विठुरायाच्या नामघोषात भेटीसाठी पायी मार्गक्रमण करत आहेत. या अखंड भक्तीमय प्रवासात वारकऱ्यांची सेवा करणे ही खरी विठ्ठलसेवा हे मनाशी बाळगून डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड रुद्राली पाटील चाकूरकर संचलित साई फाउंडेशनने यंदाही वारकऱ्यांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.

आज देवघर निवासस्थानी या अँब्युलन्स चे विधिवत डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर व ॲड. रुद्राली पाटील चाकूरकर यांच्या हस्ते पूजन करून साई फाउंडेशन तर्फे मोफत रुग्णवाहिका सेवेला ही अँब्युलन्स वारीसाठी रवाना करण्यात आली. मागील सात वर्षांपासून ही सेवा अखंडपणे सुरू असून, पालखी मार्गावर आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण प्रवासात २४ तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, आवश्यक औषधोपचार तसेच आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या रुग्णालयात तत्काळ दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

दरवर्षी हजारो वारकरी या सेवेचा लाभ घेतात. समाजसेवा, मानवता आणि भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे ही वारी. या पुण्यसेवेत सहभागी होण्याची संधी लाभणे, हे आमचे सौभाग्य असल्याचे मत यावेळी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.

पुढील १५ दिवस ही सेवा वारकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार असून, सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षिततेची हमी मिळणार आहे. यावेळी भाजपाचे सुनील होनराव, संजय रंदाळे, नगरसेवक राजकुमार आवाजकर, नगरसेवक प्रवीण कस्तुरे, विनय जागते, ऋषी राजे, पुनीत पाटील, मंडळ अध्यक्ष रोहित पाटील युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, उदय देशपांडे, विपुल गोजमगुंडे, अभिषेक चौडा, विजय अवचारे, विजयकुमार स्वामी, रमण लातूरे, शशिकांत बिराजदार आदी मान्यवर साई फाउंडेशन चे स्वयंसेवक तथा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होत

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted