पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये कुत्र्यांचा कहर…भटक्या कुत्र्यांचा जपान व केनिया प्रशिक्षकांवर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (3 ऑक्टोबर) सकाळी, जपान आणि केनिया संघांच्या प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांनी थेट हल्ला केला, यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

नेमकी घटना कशी घडली?

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खेळाडू आणि प्रशिक्षक सराव सत्रात व्यस्त असताना, दोन भटके कुत्रे स्टेडियमच्या आवारात घुसले. केनियाचे प्रशिक्षक डेनिस मराझिया कॉल रूमजवळ आपल्या खेळाडूंशी बोलत असताना, एका कुत्र्याने त्यांच्या पायावर चावा घेतला. रक्तस्राव सुरू झाल्यावर तात्काळ त्यांना वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले.

केवळ काही मिनिटांनी, जपानच्या महिला प्रशिक्षक मेइको ओकुमात्सु सराव ट्रॅकवर निरीक्षण करत असताना दुसऱ्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही हल्ले अर्ध्या तासाच्या अंतराने घडले आणि यामुळे संपूर्ण स्पर्धा परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं.

तातडीने उपचार आणि आयोजकांचे स्पष्टीकरण

आयोजन समितीने घटनेची तातडीने दखल घेत दोन्ही प्रशिक्षकांना सफदरजंग रुग्णालयात हलवलं. तिथे प्राथमिक उपचार व अँटी-रेबीज इंजेक्शन दिल्यानंतर, प्रशिक्षकांना त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित परत नेण्यात आलं. आयोजकांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. कुत्रे पकडणारी दोन विशेष पथके आता स्टेडियम परिसरात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली आहेत.

World Para Athletics Championships 2025

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments