सोमवारी होणार महापौरांची निवडजिल्हाधिकारी असणार

लातूर /प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.

महापौर पदासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी काँग्रेसकडून जयश्री भालचंद्र सोनकांबळे व वंचित बहुजन आघाडीकडून निकिता रोहित सोमवंशी यांनी अर्ज दाखल केले आहेत.उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून स्नेहल श्रीकांत उटगे व वंचित बहुजन आघाडी कडून सचिन अर्जुनराव गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

महापौर व उपमहापौर निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.यावेळी अर्जांची छाननी केली जाईल.त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत तर त्यानंतर महापौर पदासाठी व उपमहापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाईल. अनुक्रमे मतदान झाल्यानंतर दोन्ही पदांसाठी उमेदवारांना पडलेल्या मतांनुसार उमेदवाराची घोषणा पिठासीन अधिकाऱ्यांकडून केली जाईल अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments