दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे आंदोलन छेडले. सोमवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरवरून हटवले असले, तरी मंगळवारी सकाळपासूनच शेकडो आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान कालच्या संसदेवरील मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, दिल्ली पोलिसांना अत्यंत क्रूरपणे मुलांना मारलं, १२-१२ वर्षाच्या मुलींचं डोकं फोडलं. पुरुष पोलिसांनी मुलींचा गळा पकडून त्यांचं डोकं फोडलं. मी स्वत: पाहिलं. माझ्या बाजूलाही मुलगी आहे. पोलिसाने तिचे कपडे फाडले. तिच्या छातीवर पाय दिले,. पोलिसांना मुलांचा खून करण्याचे ऑर्डर होते का. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी मुलांचं रक्त सांडवायचं होतं का? मुलांचं डोकं फोडू नये म्हणून आम्ही मागे हटलो. सरकारला मुलांची पर्वा नाही. मुलांवर ज्या पद्धतीने मारलं जात होतं. त्यावरून दिल्ली पोलिसांना काय ऑर्डर होतं हे समजून येतं. माझे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे, तर आरोप लावण्यापेक्षा संपूर्ण चौकशी करा आणि माध्यमांसमोर घेऊन या, असा सवाल अभिजीत दिपके यांनी यावेळी केला.
